Thursday, April 18, 2019

डॉ. कलबाग अपंग पुनर्वसन केंद्राचा वार्षिकोत्सव - 2019

डॉ. कलबाग अपंग पुनर्वसन केंद्राचा वार्षिकोत्सव मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता पु. ल. देशपांडे सभागृहामध्ये साजरा होणार आहे. केंद्रातील गतिमंद मुले वार्षिकोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. मुलांचे कौतुक करण्यासाठी आपण सर्वानी या कार्यक्रमास यावे ही आग्रहाची विनंती.

Friday, March 29, 2019

पुलकित - अपरिचित आणि परिचित पुल

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेतर्फे 'पुलकित' हा कार्यक्रम शनिवार दि. ३० मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ५ वाजता पु. ल. देशपांडे सभागृहात आयोजित केला आहे. श्रीमती माधुरी नाईक, श्रीमती साक्षी देशपांडे आणि दिलासा केंद्राचे सभासद हा कार्यक्रम सादर करतील.

सर्वांना हार्दिक आमंत्रण

Saturday, March 23, 2019

पुलोत्सव - धावता आढावा

संस्थेतर्फे गेली अनेक वर्षे पुलोत्सव साजरा केला जातो. त्याचा धावता आढावा बघण्यासाठी येथे क्लिक करा. संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती नीला रवींद्र यांनी खूप मेहनत घेऊन हा व्हिडियो तयार केला आहे. त्यांचे विशेष आभार.

youtube वर प्रकाशित होणारा संस्थेचा हा पहिला व्हिडियो आहे.

Thursday, March 21, 2019

पुरस्कार वितरण समारंभ २०१९

संस्थेतर्फे दरवर्षी 'समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार' आणि 'कवी मोरेश्वर पटवर्धन काव्यपुरस्कार' असे दोन पुरस्कार दिले जातात. तसेच दर दोन वर्षांतून एकदा 'गुरुवर्य मा. सी. पेंढारकर ग्रंथपुरस्कार' दिला जातो. या पुरस्कारांसाठी सुयोग्य व्यक्ती/संस्था आणि पुस्तके निवडण्याचे काम संस्थेच्या ग्रंथालय शाखेवर सोपवण्यात आले होते.

निराधार मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या 'एकता निराधार संघ' या संस्थेची यावर्षीच्या आगरकर पुरस्कारासाठी तसेच 'माझ्याही कविता' या काव्यसंग्रहासाठी श्री. अमूल पंडित यांची पटवर्धन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कै. मधुकर केशव ढवळीकर यांना 'भारताची कुळकथा' या पुस्तकासाठी पेंढारकर पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच श्री. वा. फाटक ग्रंथालयातर्फे बालविभाग व प्रौढविभाग यांमधून दोन सभासदांना सर्वोत्तम वाचक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पुरस्कारप्रदान समारंभ शनिवार दिनांक २३ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ५.३० ते ८:०० या वेळेत संस्थेच्या गोखले सभागृहात होईल. मुंबई ग्राहक पंचायत या संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती.

रमी स्पर्धा २०१९

सीताबाई गणेश पेठे स्री शाखेतर्फे १९ मार्च रोजी रमी स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी ३०एक स्पर्धक उत्साहाने ३-३० वाजता हजर झाल्या .स्पर्धेचे नियम समजून घेऊन सर्वजणी हसत खेळत रमी खेळण्यात दंग झाल्या .हळूहळू स्पर्धेला रंग चढत गेला .७ वाजता स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आला:
  1. श्रीमती वैशाली जोग
  2. श्रीमती आशाताई जोशी
  3. श्रीमती दीपा पेठे
श्रीमती वसुधा पंडित यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली .

आजी आजोबांचा पालकत्वातील सहभागरविवार दि. १७ मार्च २०१९ रोजी बालक पालक केंद्राने 'आजी आजोबांचा पालकत्वातील सहभाग' या विषयावर व्याख्यान आयोजित .केले होते. त्यावेळी डॉ. सुजाता फडके यांनी उपस्थित पालकांशी संवाद साधला.

Monday, March 18, 2019

हल्ली मुले ऐकतात का? -- वय वर्षे ८ ते १२ मुलांशी संवाद

'हल्ली मुले ऐकतात का?'
दहापैकी नऊ पालकांच्या तोंडातून दिवसातून दहा वेळा येणारे हे वाक्य !
कसे बोलायचे?, कुणी बोलायचे?, कधी बोलायचे? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काय बोलायचे? -- हा सगळ्यात मोठा पेच प्रसंग पालकांसमोर, शिक्षकांसमोर आणि मुलांशी संपर्कात असलेल्या सर्वांसमोर असतो.
वय वर्षे ८ ते १२ वयोगटातील मुले ऐकून न ऐकल्यासारखे करणे, उलट उत्तरे देणे अशा विविध प्रकारे संवादामध्ये अडथळे आणतात. पालकही मग चिडून बोलूयात नकोत अशा भूमिकेत जातात.
रविवार दि. २४ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळात या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. पालकत्व तज्ञ डॉ. सुजाता फडके या विषयावर पालकांशी मनमोकळेपणे चर्चा करतील.
स्थळ - कृष्णाबाई खंबदकोण बालक पालक मार्गदर्शन केंद्र, नाडकर्णी बाल कल्याण केंद्र, चित्रकार केतकर मार्ग, डहाणूकर कॉलेजमागे, विले पारले (पूर्व)
वेळ - रविवार दि. २४ मार्च २०१९ सकाळी ११ ते दुपारी १

अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी कृपया ०२२-२६११७१९५ वर संपर्क साधा. अथवा श्रीमती मंगल दांडेकर (९३२२२१६३६२) यांच्याशी संपर्क साधावा.