Saturday, November 11, 2017

‘ब्रिज’ प्रशिक्षण केंद्र

‘ब्रिज’ हा धनदांडग्यांचा वेळ घालवण्यासाठी खेळायचा पत्त्यांचा डाव म्हणून ओळखला जातो. या विस्मयकारक खेळाबद्दलचा गैरसमज आपाल्या समाजातील सुशिक्षित लोकांमध्ये पण आहे. काही जण याला एक जुगाराचा खेळ म्हणून देखील शिक्का मारतात. पण प्रत्यक्षात ‘ब्रिज’ हा बुद्धिमत्ता खेळ म्हणजे (mind game) आहे. world mind game federation ने हे ओळखून आपल्या वार्षिक कार्यक्रमात हा खेळ समाविष्ट केला आहे. अनुभवातून असे समजले आहे की हा खेळ संभाषण कौशल्य, तार्किक विचार व परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि बदलण्याची क्षमाता सुधारतो. या खेळामुळे लहान मुलांच्या बुद्ध्यांकात (IQ) सुधारणा करण्यात मदत होते आणि ज्येष्ठ नागरिकांना अल्झायमर / अल्झायमरच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत मिळते.

राष्ट्रकुल स्पर्धेत हा खेळ आधीच समाविष्ट करण्यात आला आहे आणि २०१८ पासून प्रथमच आशियाई खेळांमध्ये याचा सामावेश होईल. आपल्या देशात Bridge Federation of India (BFI) ही राष्टीय स्तरावर खेळाचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे. भारत सरकारच्या क्रीडा खात्याची या संस्थेस मान्यता आहे. BFI Indian Olympic Association ची सुध्दा सदस्य आहे.

आपल्या संस्थेच्या क्रीडा शाखेतर्फे आपण ब्रिज प्रशिक्षण केंद्र सूर करत आहोत. पहिला प्रशिक्षण कार्यक्रम दि. १५ नोव्हेंबर २०१७ पासून संस्थेच्या नाडकर्णी केंद्रात सुरु होत आहे. केंद्राचे मुख्य कार्य खालीलप्रमाणे असेल:
  • प्रशिक्षण
  • अभ्यासासाठी ग्रंथालय
  • खेळण्याची व सराव करण्याची सुविधा
  • स्पर्धात्मक कौशल्य सुधारण्याची सुविधा
आपणांस आमच्या या प्रशिक्षण केंद्रात यायचे असेल तर कृपया संघ कार्यालयात संपर्क साधावा. आपण आमच्या क्रीडा शाखेच्या कार्यकर्त्यांशीही संपर्क साधू शकता:
  • श्री. विजय जोशी ९८२१०८८३०७
  • श्री. प्रभाकर जोशी ९८२०३ ९२१४६
  • श्री. अविनाश बर्वे ९८२०१ ३७३९७