Friday, December 29, 2017

ग. वा. केळकर - शोकसभा

लोकमान्य सेवा संघाचे कार्यकारी मंडळ सदस्य श्री. गजानन केळकर यांस शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी देवाज्ञा झाली. त्या संदर्भात रविवार दि. ०७ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या गोखले सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात येत आहे.

सभेमध्ये बोलू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपले नाव व दूरध्वनी क्रमांक संघ कार्यालयात कार्यालय अधीक्षकांकडे बुधवार दि. ०३ जानेवारी पर्यंत द्यावीत. प्रसंगाचे औचित्य व वेळ विचारत घेता प्राधान्य क्रमानुसार पहिल्या पाच व्यक्तींनी विचार मांडावेत अशी अपेक्षा आहे. त्यानुसार पहिल्या पाच व्यक्तींना दूरध्वनीद्वारे अगोदर कळवण्यात येईल.

0 comments:

Post a Comment