Saturday, September 15, 2018

विशेष सर्वसाधारण सभा - रविवार दि. ०७ ऑक्टोबर २०१८ (फक्त संघ सभासदांसाठी)

संस्थेच्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ०७ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ३.३० वाजता पु.ल. देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

सभेपुढील कामे:
  1. पु. ल. फौंडेशन ही विश्वस्त संस्था लोकमान्य सेवा संघात १९९९ साली विलीन झाली. त्यावेळी पु. ल. फौंडेशनकडे असलेले पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे सर्व स्वामित्वहक्क संघाकडे आलेले आहेत. २०१८-१९ हे पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संघाकडे असलेले पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे सर्व स्वामित्वहक्क लोकार्पण करण्यास मान्यता देणे.
  2. लोकमान्य सेवा संघाच्या लोकमान्य निवास या इमारतीत ६ भाडेकरू राहतात. ते साधारणत: २,८०० चौरस फूट जागा वापरत आहेत. संघाला जागेची अत्यंत आवश्यकता आहे. तरी योग्य ती भरपाई देऊन त्या जागा संघाच्या ताब्यामध्ये घेण्यास मान्यता देणे. भरपाईसाठी जास्तीत जास्त रुपये ४ कोटी खर्च करण्यास मान्यता देणे.
संघ कार्यवाह,
लोकमान्य सेवा संघ, पारले
Posted in:

0 comments:

Post a Comment