आतापर्यंतच्या तपशिलावरुन आपल्या ध्यानांत आलेच असेल की संघाच्या संपुर्ण कार्याची उभारणी ही लोकाश्रयावर आधारलेली आहे. समाजाच्या विविध गरजा भागविणे आणि जीवनावश्यक सोई उपलब्ध करून देणॆ या गोष्टीला प्रचंड आर्थिक बळ लागते. सभागॄह भाडयासाराखी संस्थेजवळ उपलब्ध अर्थार्जनाची साधने खूपच तुटपुंजी आहेत. जनतेकडून मिळणाऱ्या देणग्यांचे बळावरच हा जगन्नाथाचा रथ ओढला जातो. देणगीची रक्कम किती ही नगण्य बाब आहे. देणगी देण्याची इच्छा हीच महत्वाची गोष्ट. यातून जनतेचा संस्थेवरील विश्वास प्रकट होतो. संस्थेच्या विविध उपक्रमांना आपापल्या आवडीनुसार देणगीदार एखाद्या प्रसंगाची अथवा व्यक्तीची आठवण म्हणुन आवर्जुन देणग्या देतात. देणगीच्या रकमेनुसार आणि देणगीदारांच्या इच्छेनुसार अशा देणग्यांची स्मृती संस्थेच्या विविध सभागृहांना, शाखांना अगर कामांना देणगीदाराचे नाव देऊन चिरस्थायी करण्यांत येते. आपल्याला देणगी देण्याची इच्छा असल्यास आपण जिथे असाल तेथुन देणगी संस्थेकडे पाठवु शकता. सोबत देणगी देण्याचा उद्देश देणगीच्या विनियोगासंबंधीची कल्पना आणि अपेक्षा आदी तपशील पत्राव्दारे कळविल्यास सोईचे होते. संस्थेकडे येणाऱ्या देणग्या आयकर कायद्याखाली देणगीदाराला आयाकरामध्ये सूट मिळण्यास प्रमाणित आहेत. |
![]() |
जून 15, 2009
Curabitur arcu tellus, suscipit in, aliquam eget, ultricies id, sapien. Nam est.
अधिक माहिती...
जून 15, 2009
Curabitur arcu tellus, suscipit in, aliquam eget, ultricies id, sapien. Nam est.
अधिक माहिती...
जून 15, 2009
Curabitur arcu tellus, suscipit in, aliquam eget, ultricies id, sapien. Nam est.
अधिक माहिती...
