वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली कोणीही व्यक्ती संघाची सभासद होऊ शकते आणि विविध वर्गांतील सभासदांचा संघाच्या सर्वसाधारण सभासदवर्गात समावेश होतो. सभासदत्व स्वीकृतीसाह संघाचा कारभार संघाचे कार्यकारी मंडळ चालविते. कार्यकारी मंडळ दोन कार्यवाहांसह २० सभासंदाचे बनलेले असते आणि सर्वसाधारण सभासदवर्ग दर तीन वर्षांनी कार्यकारी मंडळाची निवडणूक करतो. कार्यकारी मंडळाच्या २० सदस्यांपैकी २ कार्यवाह आणि १५ सदस्यांची निवड अशा निवडणुकीद्वारे करण्यांत येते आणि उर्वरीत ३ कार्यकारी मंडळ सदस्यांची नेमणूक कार्यकारी मंदळ सर्वसाधारण सभासदांतून प्रतिनियुक्ती पध्दतीने करते. संघाच्या विविध उपक्रमांसाठी आवश्यक आर्थिक पाठबळाचा मुख्य स्त्रोत सभासद आणि जनतेकडून मिळ्णाऱ्या देणग्या हा आहे. या प्रमुख स्त्रोताला संघाचे इमारतीतील सभागृहे विविध समजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी देण्यात येतात त्या प्रित्यर्थ मिळणाऱ्या भाडयाचा तसेच संघातर्फे जनतेला दिल्या जाणाऱ्या काही सेवांसाठी आकारल्या जाणाऱ्या लाक्षणिक शुल्क रुपाने जमा होणाऱ्या रकमेचा हातभार लागतो.



सभासदत्व

>> योजना
>> नोंदणी