भविष्यातील संकल्प

इमारत विकास आणि विस्तार

स्थापनेनंतर सुरवातीच्या १-२ वर्षे लोकमान्य सेवा संघाचे कार्य लोकशिक्षण आणि सामाजिक बांधिलकी जागविण्याचे दृष्टीने सभा, व्याख्याने, कीर्तने, गणेशोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी अशा मोजक्याच कार्यक्रमांपर्यंत सीमीत होते. स्वत:ची वास्तू नसल्याने हे कार्यक्रम जवळच्या श्रीराम मंदिरांत होत असत. लवकरच संघाने १६०० चौ.फू.आकाराची जमीन त्यावर ४0' ३0' आकाराची एक छोटीशी इमारत उभारली. या इमारतीला अर्थांतच 'टिळकमंदिर' असे नामकरण करण्यांत आले. यशावकाश संघाला मूळ इमारतीशी संलग्न आणखी जमीन उपलब्ध झाली आणि संघाच्या विविध संकल्पनांना मूर्त स्वरुप देणारे कार्य करणाब्या विविध शाखांना इमारत विस्तारानंतर जागा उपलब्ध झाली. वेगवेगळ्या शाखांच्या कामाला मूर्त स्वरुप देण्यासाठी आर्थिक आधार पुरविणाब्या उदार देणगीदारांच्या नांवाने विविध शाखेंचे नामकरण करण्यांत आलें आणि हे उचितही होते.

वाढत जाणाब्या शाखांच्या विस्ताराबरोबर आणि नवे उपक्रम चालू करण्यामुळे जागेची गरज वाढत गेली. संस्थेने इमारतिच्या उत्तर आणि पश्चिम दिशेला असलेले भूभाग विकत घेतले. पैकी पश्चिमकडील सुमारे ९००० चौ.फूट क्षेत्रफळाचे मोकळे मैदान करण्यांत आले आणि उरलेल्या उपलब्ध जमिनीवर इमारतीचा विस्तार करण्यांत आला. इमारतीत सभागृहे बांधण्यांत आली. यासाठी येणारा अफाट खर्च भागबिण्यासाठी ज्या उदार देणगीदारांनी अर्थसहाय्य केली त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा देणगीदारांची नांवे त्या सभागृहांना देण्यांत आली. अर्थांत सर्व इमारत एकाच वेळी न होतां टप्प्याने झाला. इ.स. १९३५ मध्ये झाले त्या पहिल्या इमारत विस्तारामध्ये इमारतीच्या तळमजल्यावर कु.कृष्णाबाई लिमये व्यायामशाळा आणि पहिल्या मजल्यावर ६,००० चौ.फुटाचे गोखले सभागृह बनविण्यांत आले. या सभागृहाची आसन क्षमता सुमारे एक हजार एवढी आहे. सन १९६२ मध्ये उत्तरेकडील भूभागावर ६००० चौ. फुटाचे बांधकाम करण्यांत आले. ज्यामुळें तळमजल्यावर साठे सभागृह आणि वरच्या मजल्यावर टिळक सभागृह आकाराला आले. टिळक सभागृह आणि गोखले सभागृहाचे बाहेरील सज्जवर खालिल मजल्यांपेक्षा कमी उंचीचा मजला बांधून त्यामध्ये श्री.वा.फाटक ग्रंथसंग्रहालय आणि मा.सी. पेंढारकर वाचनालयाची सोय करण्यांत आली.

Iसन. १९७१ मध्ये संघाला इमारतीवर आणखी एक मजला बांधण्याची परवानगी मिळाली. या कामासाठी पु.ल.देशपांडे फाऊंडेशनने देणगीरुपाने मदत देण्याचे मान्य केले. या उदार देणगीतून ६,००० चौ. फूटाआकाराचे पु.ल.देशपांडे सभागृह आणि ५०० चौ.फूट आकाराचे इंदिराबाई काळे सभागृह तयार झाले.

विविध टप्प्यांत झालेल्या या सर्व इमारत विस्ताराचे परिणामस्वरुप सेवा संघाजवळ विविध शाखांच्या कार्यासाठी एकूण सुमारे २०,००० चौ. फूट बंदिस्त जागा उपलब्ध झाली. परंतू कालौघामध्ये संघाने हाती घेतलेल्या नवनवीन उपक्रमांमुळें ही उपलब्ध जागाही अपूरी पंडू लागली आणि संघाने सुयोग्य भूभागाचा नव्याने शोध सुरु केला. या दरम्याने विलेपार्ले येथील एक दानशूर आणि सामजिक बांधिलकीची जाण असलेले ज्येष्ठ नागरिक श्री. मोहनराव नाडकर्णी यांनी ५,५०० चौ. फूट क्षेत्रफळाची त्यांच्या मालकीची जमीन त्यावर बांधलेल्या घरासकट संघाला दान देण्याची इच्छा व्यक्त केली. संघाने या जमिनीचा विकास कार्यक्रम राबवून त्यावर ८,५०० चौ. फूट चटई क्षेत्रफळाची चार मजली वास्तु उभी केली आणि मोहनराव नाडकर्णीच्या औदार्याबद्दलची कृतज्ञता संघाने सदर इमारतीला 'नाडकर्णी बालकल्याण केंद्र' असे नांव देऊन व्यक्त केली. आज मितीला या इमारतीत राधाबाई फडणीस बालमंदिर, दिशा कर्णबधिर विद्यालय आणि डॉ. कर्णबधिर अपंग पुनर्वसन केंद्र आदी शाखांचे काम चालते .

लोकमान्य सेवा संघाचे परमभाग्य असे की स्थापनेपासून आजतागायत संस्थेला निरलस आणि सेवा भावी कार्यर्क्त्यांच्या मदतीचा हात सदैव लाभला आणि आजही जेव्हा समाज अधिकाधिक आत्मकेंद्री आणि स्वार्थी बनत असल्याची सर्वसाधारण ओरड असतांना संघाकडे येणारा सेवा भावी कार्यकर्त्याचा ओघ अखंड सुरु आहे. संघाकडे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनांतून राबविण्याजोग्या अनेक कल्पना आणि विविध योजना आहेत. अर्थात हे सव्धचद आर्थिक पाठबळ उपलब्ध झाल्यासच शक्य होऊ शकेल. गेल्या आठ दशकांतील अनुभवामुळें संघाचा समाजाच्या दातृत्वावर आणि सेवाभावी कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पूर्ण विश्वास आहे. ज्यांच्या सहाय्याने भविष्यांत हे सर्व संकल्प प्रत्यक्षांत उतरतील यांत शंका नाही. समाजोपयोगी अशा या कार्यासाठी प्रत्येकाने यथाशक्ती मदतीचा हात पुढे करावा अशी इच्छा व्यक्त करतानांच प्रत्येक व्यक्तीने या सेवा यज्ञांत अर्पिलेल्या हविर्भागाचे स्वागत करण्यास लोकमान्य सेवा संघ सदैव उत्सुक आहे.

सुचना

जून 15, 2009
Curabitur arcu tellus, suscipit in, aliquam eget, ultricies id, sapien. Nam est.
अधिक माहिती...

जून 15, 2009
Curabitur arcu tellus, suscipit in, aliquam eget, ultricies id, sapien. Nam est.
अधिक माहिती...

जून 15, 2009
Curabitur arcu tellus, suscipit in, aliquam eget, ultricies id, sapien. Nam est.
अधिक माहिती...